जसप्रीत बुमराहचे अव्वल पद कायम; Icc टेस्ट रँकिंगमध्ये जाडेजाही टॉपलाच
.jpeg)
दुबई: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी कसोटी
क्रिकेट रँकिंग मध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे अष्टपैलूंच्या
क्रमवारीत भारताच्या रवींद्र जडेजा हा सुद्धा टॉपलाच राहिला आहे. Icc ने बुधवारी जाहीर केलेल्या नव्या रँकिंग मध्ये बुमराह आणि जडेजा यांनी
टॉपची जागा कायम ठेवली आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियात झालेल्या गावस्कर- बॉर्डर कसोटी
मालिकेत जसप्रीत बुमरा यांनी अनेक विक्रम निर्माण केले आहेत. या पाच सामन्यांच्या
मालिकेत बुमराहने तब्बल 907 पॉईंट्सची कमाई केली. मालिका भारताने गमावली तरी
जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या दोघा खेळाडूनी चमकदार कामगिरीतील सातत्य कायम
ठेवले.