विजयपूरात भाजपाचा काँग्रेस सरकारविरुद्ध जनआक्रोश मोर्चा

विजयपूर:- जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ, मुस्लिम समाजास विशेष सवलती, मागासवर्गीय निधीचा दूरुपयोगाचा विरोधात भाजपाचे राज्य
अध्यक्ष विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. "भ्रष्ट काँग्रेस सरकार हटवा... महागाईविरुद्ध
लढा..." अशा घोषणा देत भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांसह पक्ष अभिमानी सहभागी
झाले होते राज्यातील
काँग्रेस सरकार महागाई
वाढवत असून, दलितांच्या
कल्याणासाठी असलेला निधी लुटत आहे असा आरोप करत भाजपने संपूर्ण राज्यभरात सुरू
करण्यात आली असल्याची विजयेंद्र यांनी सांगितले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मोर्चास सुरुवात करण्यात आली उघड्या
वाहनातून हे सर्व नेते जनआक्रोश यात्रेत सहभागी झाले होते. हजारो कार्यकर्ते या
यात्रेत सहभागी झाले. येथून
सुरू झालेली यात्रा शहरातील प्रमुख मार्गांद्वारे दरबार हायस्कूल मैदान येथे
पोहोचली. यात्रा जेव्हा गांधी चौक येथे पोहोचली, तेव्हा
माजी नगरसेवक उमेश वंदाळ आणि शिवानंद भुय्यार* यांनी क्रेनच्या साहाय्याने
नेत्यांना मोठा हार अर्पण केला, हे विशेष
ठरले. गांधी
चौक, बसवेश्वर चौक, डॉ
आंबेडकर चौक कनकदास चौक मार्गे दरबार हायस्कूल मैदानावर पोहोचली यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारविरुद्ध
घोषणाबाजी करीत होते भाजप
प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, माजी
मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, विधान
परिषद विरोधी पक्षनेते छलवाडी नारायणस्वामी खासदार रमेश जिगजिणगी माजी मंत्री
अप्पासाहेब पटनशेट्टी एस.के. बेल्लुब्बी भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, पी राजू, *विजुगौडा
पाटील, उमेश कारजोल व इतरांनी राज्य काँग्रेस सरकार विरोधात
आपल्या भाषणातून टिका केली . चंद्रशेखर कवटगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
केले.