कर्नाटक बसवर 'जय महाराष्ट्र' चालकाला भगव्या गुलालाने रंगवले

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर कर्नाटकात झालेल्या हल्ल्याचे संतप्त पडसाद सोलापुरातही उमटत आहेत. सोमवारी सोलापुरात ठाकरे गटाच्या  शिवसैनिकांनी  कर्नाटकच्या एसटी बस चालकाला भगव्या गुलालाने माखून काढले. एसटीवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र च्या घोषणा लिहिल्या. यावेळी शिवसैनिकांनी जय महाराष्ट्राच्या  जोरदार घोषणाबाजी केली.