जय जवान जय किसान सैनिक शाळेचा १० वीचा १००% निकाल सलग १४व्या वर्षीही कायम

जय जवान जय किसान मुलांची सैनिकी शाळा व ज्युनिअर कॉलेज, सोलापूरने १०वीच्या बोर्ड परीक्षेत सलग १४व्या वर्षीही १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. पहिल्या तीन यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे:

प्रथम: बोंबलट सिद्धनाथ गोरख – ९१.००%

द्वितीय: हजारे शौर्य बालाजी – ९०.६०%

तृतीय: नदाफ रेहान रफिक – ८८.६०%

सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

या घवघवीत यशानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. सुभाष चव्हाण, प्राचार्य रवींद्र चव्हाण तसेच सैनिक शाळेचे कमांडंट श्री अशोक कुमार यांनी सर्व शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.