इस्रायल-इराण संघर्ष आणखी तीव्र; हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने तेल अवीव हादरले

तेहरान :- इराण आणि इस्रायल यांच्यातील हवाई संघर्ष आज (दि. १८ जून) सलग सहाव्या दिवशीही सुरू आहे. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवत युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इराणने इस्रायलवर हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागल्याचा दावा केला आहे. युद्धाच्या इतिहासात प्रथमच या प्रचंड वेगाने धडकणाऱ्या क्षेपणास्त्राचा वापर होत आहे. तेल अवीववर भीषण हल्ला बुधवारी पहाटे इराणने इस्रायलच्या तेल अवीव शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यामुळे अनेक भागांमध्ये स्फोट झाले आणि शहरात घबराट पसरली. त्याच्या प्रत्युत्तरात इस्रायली हवाई दलाने तेहरानजवळील संशयित लष्करी ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यांमुळे तेहरान परिसरातील नागरी भागालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे इस्रायल सरकारने या भागातील नागरीकांना आधीच स्थलांतर करण्याचा सल्ला दिला होता. ट्रम्प यांचा इशारा – “शरणागती पत्करा!” इराण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असताना, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला “निर्विवाद शरणागती पत्करण्याचे” आवाहन केले आहे. त्यांनी अयातोल्ला अली खोमेनी यांना इशारा दिला की अमेरिका आता संयम गमावत आहे.” या पार्श्वभूमीवर १७ जून रोजी ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

युद्धाचा भडका?

हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक तीव्र झाला असून, मध्य पूर्वेत मोठ्या युद्धाचा धोका गडद झाला आहे.
राजकीय तज्ञांच्या मते, पुढील २४ तास निर्णायक ठरू शकतात.