खराब झाली आहे का ?
.jpeg)
आपल्या भारतीय स्वयंपाक घरात प्रेशर कुकरचा फार वापर होत असतो. रोजचे जेवण झटपट बनवण्यासाठी या प्रेशर कुकरची मदत होत असते. कुकरचा वापर सामान्यतः डाळी, तांदूळ, भाज्या • लवकर करण्यासाठी केला जातो. मात्र, याचा अधिक वापर • केल्याने किंवा कुकर जुना झाल्यानंतर याची शिट्टी नीट काम करत नाही. अनेकदा कुकर गॅसवर ठेवले की, त्यातून पाणी बाहेर पडू लागते, हे अनेकदा आपली गॅसची शेगडीही खराब करत असते. असे तुमच्यासोबतही कधी ना कधी घडले असेल. या समस्येवर एक जालीम उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. फक्त मोहरीच्या तेलाच्या वापराने तुम्ही ही समस्या दूर करू शकता. तुमच्या कुकरही शिट्टी वाजताच डाळी किंवा तांदळाचे पाणी बाहेर काढत असेल तर एक सोपी युक्ती तुमच्या कामी येईल.
व्हिडिओमध्ये दाखवलेली ही सोपी युक्ती तुम्ही नक्कीच वापरून पाहू शकत. यासाठी प्रेशर कुकरला गॅस लावल्याचे व्हिडिओत दिसत आहे. नंतर झाकण ठेवून शिट्टी काढून त्यावर अर्धा चमचा मोहरीचे तेल टाकले जाते. तसेच रबर काढल्यानंतर त्या भागात तेल टाकण्यात आले आहे. मग झाकण ठेवले जाते. आता प्रेशर कुकरची शिट्टी वाजत आहे, पण बाहेर काहीच येत नाही. मात्र, व्हिडिओमध्ये तेल घालताना कुकर रिकामा दाखवण्यात आला आहे. हे कसे करावे याबद्दल लोकांना ही पद्धत पूर्वी सांगितली जाण्याची शक्यता आहे.