श्री. न.फू.शहा कोठारी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न..

सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश यादवाड सर होते. योग प्रशिक्षणासाठी श्रीराम विजयकुमार जोशी (स्वामी विवेकानंद केंद्र, अमृत परिवार) आणि सौ. मंजिरी श्रीराम जोशी (स्वामी विवेकानंद केंद्र, मातृत्वयोग प्रमुख) उपस्थित होत्या. अध्यक्षांच्या शुभहस्ते दोन्ही योगप्रशिक्षकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या योगशिबिरात प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे उद्दिष्टे आणि महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर योगासनांचे आणि सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. या शिबिरात शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माने ए. एस. यांनी तर आभारप्रदर्शन श्री. मेहता आर. आर. यांनी केले.