महागाई भत्त्यात 2% वाढ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि
निवृत्तीवेतनधारकांसाठी (Pensioners) मोठा दिलासा देणारा
निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) 2% वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
यामुळे आता DA आणि DR 53% वरून 55%
पर्यंत वाढले आहेत.
ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या
शिफारशींनुसार करण्यात आली आहे आणि याचा सुमारे 47 लाख
कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना लाभ होईल. महागाई
भत्त्याची वाढ 1 जानेवारी 2025 पासून
लागू होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना येत्या महिन्यात मागील तीन महिन्यांचे थकबाकीचे
(arrears) पैसे मिळण्याची शक्यता आहे.
सरकारी तिजोरीवर आर्थिक भार
महागाई भत्त्यातील या वाढीमुळे केंद्र सरकारवर दरवर्षी हजारो कोटी
रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, वाढत्या
महागाईचा सामना करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही फायदा होण्याची
शक्यता
हा निर्णय फक्त केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. मात्र,
अनेक राज्य सरकारे केंद्राच्या धर्तीवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठीही DA
वाढवण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा महत्त्वाचा भाग असतो.
गेल्या काही महिन्यांत महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांकडून DA वाढीची मागणी केली जात होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य करत 2% वाढ जाहीर केली, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे
वातावरण आहे.