आळंदीत इंद्रायणी नदी. रौद्र, पण मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी नाही; आज माऊलींची पालखी पंढरीकडे

आळंदी 19 जून 2025 :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आळंदी आणि परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्याने इंद्रायणी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. नदी दुथडी भरून वाहत असून, घाटावरील मंदिरे, स्वागत कक्ष आणि चेंजिंग रूम पाण्याखाली गेल्या आहेत. इंद्रायणीचा प्रकोप आणि प्रशासनाची तयारी नदीची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली. घाट परिसर बंद, भाविकांना प्रवेशबंदी. पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक तैनात. दोन बोटी सज्ज, जलपर्णीचा प्रचंड प्रवाह वाहताना दिसतो आहे. पावसाचे जोरदार आगमन, वारकऱ्यांची श्रद्धा अढळ पावसामुळे आळंदीत अनेक ठिकाणी पाणी साचले असून, वारकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मात्र, टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाचा जयघोष करत वारकरी उत्साहात वारीत सहभागी होत आहेत. पावसात भिजलेले वारकरी मिळेल त्या आडोशात थांबले तरी त्यांच्या चेहऱ्यावर माऊलींच्या भेटीचा आनंद स्पष्ट दिसतो. आज पालखीचे प्रस्थान आज (दि. १९) ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे. लाखो भाविक आळंदीत दाखल. पावसामुळे काहीशी अडचण असली तरी श्रद्धा आणि भक्तिभाव या साऱ्या अडचणींवर मात करत आहेत.