डाँकी मार्गाने गेलेल्या भारतीयांना परत पाठवले

मुंबई : डाँकी मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवैध रित्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयाना परत पाठविण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. २०५ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे एक लष्करी विमान सी-१७ सॅन अँटोनियोहून अमृतसरकडे रवाना झाले, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कागदपत्र नसलेल्या अमेरिकेत बेकायदेशीर वास्‍तव्‍य करत असलेल्‍या स्थलांतरितांवरील कारवाई तीव्र केली आहे. २०५ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे एक लष्करी विमान सी-१७ सॅन अँटोनियोहून अमृतसरकडे रवाना झाले.  अमेरिकेतील सार्वत्रिक निवडणुकीत ट्रम्‍प यांनी स्‍थलांतरितांना हद्दपार करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ने सुमारे १८,००० बेकायदा वास्‍तव्‍य असलेल्‍या भारतीय नागरिकांची पहिली यादीही तयार केली आहे. 'प्यू रिसर्च सेंटर'च्या आकडेवारीनुसार, भारतातून सुमारे ७,२५,००० बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत राहतात, ज्यामुळे मेक्सिको आणि एल साल्वाडोरनंतर अमेरिकेत अनधिकृत स्थलांतरितांची लाेकसंख्‍या असणारा भारत तिसरा देश आहे. अमेरिकेतील बेकायदा वास्‍तव्‍य करणार्‍या भारतीयांबाबत बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले होते की, आमचे काही नागरिक तेथे बेकायदेशीरपणे असतील तर ते पुन्‍हा भारतात वास्‍तव्‍यास येवू शकतात. दरम्‍यान, अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेल्‍या भारतीय स्थलांतरितांना परत मायदेशी घेण्याबाबत योग्य निर्णय घेतील. कॅलिफोर्निया येथे अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या ५,००० हून अधिक स्थलांतरितांना परत पाठवण्यासाठी लष्‍कराने विशेष विमान सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत, लष्करी विमानांनी ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथे स्थलांतरितांना नेले आहे.