अमेरिकेत टार्गेट स्टोअरमध्ये चोरी करताना भारतीय महिला रंगेहात पकडली; चौकशीचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेत घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल
मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. टार्गेट स्टोअरमधून चोरी करताना एका भारतीय
महिलेची रंगेहाथ पकड करण्यात आली. ही घटना यंदाच्या १५ जानेवारीची असून, अलीकडेच एका यूट्यूब चॅनेलवर बॉडीकॅम फुटेज अपलोड झाल्यानंतर ती मोठ्या
प्रमाणात चर्चेत आली आहे.
व्हिडिओमध्ये काय दिसलं?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला सतत रडताना व हुंदके देताना
दिसते. पोलिसांच्या मते ती तब्बल ४० मिनिटांपासून या अवस्थेत होती. चौकशीदरम्यान
तिने आपली प्राथमिक भाषा गुजराती असल्याचे सांगितले. भाषा
कुठून येते असे विचारले असता तिने "भारत" असे उत्तर दिले. पोलिसांनी
दुभाष्याची गरज विचारली असता तिने नकार दिला. तसेच तिच्या आरोग्य स्थितीबाबतही
चौकशी झाली.
चौकशीत उघडकीस आलेले सत्य
तपासात समोर आले की, ती महिला त्या टार्गेट
स्टोअरची सिरीयल शॉपलिफ्टर होती, परंतु तिला
पहिल्यांदाच पकडण्यात आले. महिलेनं कबूल केलं की काही वस्तू चोरी करून ती पुन्हा
विकण्याचा विचार करत होती. चौकशीदरम्यान तिच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन
आला, मात्र त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
सोशल मीडियावर चर्चा
या बॉडीकॅम फुटेजने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी
या महिलेच्या वर्तनावर प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी तिच्या रडण्याची शैली
अतिशयोक्त असल्याचे म्हटले आहे.