भारतीय वंशाचा एकांश सिंग भारताविरुद्धच चमकला; दुसऱ्या युथ टेस्टमध्ये ठोकलं शानदार शतक!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अंडर-19 युथ टेस्ट मालिकेत इंग्लंडच्या भारतीय वंशाच्या अष्टपैलू एकांश सिंग याने दुसऱ्या टेस्ट सामन्यात शानदार 117 धावांची शतकी खेळी केली आहे. पहिल्या डावात 80/5 वर अडचणीत असलेल्या इंग्लंडला एकांशने सावरले. त्याने 14 चौकार आणि 3 षटकारांसह 155 चेंडूंमध्ये 117 धावा केल्या. त्याच्या साथीला जेम्स मिंटोने 46 धावा करत चांगली साथ दिली. दोघांमधील 8व्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली.
कोण आहे एकांश सिंग?
- जन्म:
16
जुलै 2006, ऑर्फिंग्टन, लंडन
- संघ:
केंट काउंटी,
इंग्लंड U-19
- प्रकार:
उजव्या हाताचा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज
- केंटसाठी:
2
प्रथम श्रेणी सामने, 5 लिस्ट A सामने
- अंडर-19 वनडे
मालिकेत 1 विकेट
पहिल्या टेस्टमधील कामगिरी:
- 59
धावांची खेळी (पहिला डाव), दुसऱ्या डावात
1 धाव
- गोलंदाजीमध्ये
यश नाही
सामन्याचा थरार: भारताने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 80/5 पर्यंत रोखले, मात्र एकांश सिंग व थॉमस रिव यांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 309 धावा केल्या. भारताने आपल्या डावाची सुरुवात 51/1 अशी केली, पण वैभव सूर्यवंशी 20 धावांवर बाद झाला. एकांश सिंगची अष्टपैलू कामगिरी आणि भारताविरुद्धची चमकदार खेळीमुळे क्रिकेट वर्तुळात त्याची चर्चा जोरात आहे.