भारतीय वंशाचे सीईओ जगदीप सिंग यांचा दररोजचा पगार ४८ कोटी रुपये ......
.jpeg)
सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओ मध्ये सुंदर पिचाई व
मायक्रोसॉफ्ट चे सत्या नडेला यांची आजपर्यंत ख्याती होती . पण आता भारतीय वंशाचे
जगदीप पुरी यांनी त्यांना मागे टाकत
पगाराबाबत नवे विश्व रेकॉर्ड निर्माण केले
आहे . क्वान्टमस्केप या कंपनीचे भारतीय
वंशाचे संस्थापक व माजी सी इ ओ म्हणून त्यांना दररोज ४८ कोटी रुपये एवढा पगार आहे .याचाच अर्थ त्यांना
वार्षिक १७५०० कोटी रुपये पगार मिळतो . याशिवाय त्यांच्या पॅकेज मध्ये १९७२६ कोटी
रुपयांचे शेअर्स सुद्धा आहेत . एकूणच भारतीयांच्या दृष्टीने ही अभिमानाची व
गौरवाची गोष्ट आहे . याबरोबरच एक विचार मनात येतो कि एवढ्या प्रचंड पैशाचे पुरी
काय करत असतील ? माणसाला खरे तर पैशाचा उपभोग घेतला तरच त्यांचा आनंद घेता येणे शक्य आहे . एवढ्या
संपत्तीचा ते काही उपभोग घेऊ शकत नाहीत . माणसाने किती जरी संपत्ती मिळविली तरी
त्याचा उपभोग घेतला व जीवनात आनंद घेतला तेवढीच संपत्ती त्यांच्या दृष्टीने
महत्वाची असते . बाकीच्या संपत्तीला फारशी किंमत नाही असेच मत अनेकांचे आहे . इतर
पैशातून काही देणगी दिल्यास किंवा काही समाज कार्यासाठी खर्च केल्यास त्याचा
सुद्धा योग्य उपयोग झाल्यामुळे आनंद होतो एकूणच जास्त पैसे असणे व मिळविणे यामध्ये त्यांचा उपभोग घेतला तरच त्यांचा खऱ्या अर्थाने
आनंद आहे