येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया यांना फाशीची तयारी; केंद्र सरकारकडून सर्व प्रयत्न अपुरे

नवी दिल्ली :
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया यांच्या फाशीची तारीख १६ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली असून, या प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी स्पष्ट केले की सर्व शक्य प्रयत्न करूनही सरकारकडे आता फारसा वाव शिल्लक नाही. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सांगितले की, भारताचे येमेनमध्ये राजनैतिक प्रतिनिधित्व नसल्याने थेट हस्तक्षेप करणे अशक्य झाले आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी "ब्लड मनी" स्वीकारण्यास नकार दिला असल्यामुळे अन्य प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया या केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील रहिवासी असून त्या २००८ पासून येमेनमध्ये नर्स म्हणून काम करत होत्या. २०१७ मध्ये येमेनमधील तलाल अब्दो मेहदी याच्या हत्येच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. निमिषाने मात्र न्यायालयात सांगितले की, हा प्रकार आत्मरक्षणात घडला आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीकडून मुक्त होण्यासाठी तिने हे पाऊल उचलले. केंद्र सरकारने केलेले प्रयत्न वेंकटरमणी म्हणाले की, सरकारने स्थानिक शेख, स्वयंसेवी संस्था आणि प्रभावशाली व्यक्तींमार्फत "ब्लड मनी" चर्चेसाठी प्रयत्न केले. मात्र, मृताच्या कुटुंबीयांनी कोणतीही तडजोड मान्य केली नाही. केरळ सरकारची मदतीची मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात सहानुभूती ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सद्यस्थिती सध्या निमिषा प्रिया सना सेंट्रल तुरुंगात आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम अपील फेटाळले असून, केंद्र सरकारने सांगितले की, काही खासगी प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याचा परिणाम काय होईल, हे सांगता येत नाही. ही घटना विशेषतः परदेशात काम करणाऱ्या भारतीय महिलांसाठी धोक्याची घंटा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.