भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार अंतिम टप्प्यात; निर्यातीस मिळणार नवा गतीमान मार्ग

लंडन ११ एप्रिल:- भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement - FTA) आता अंतिम टप्प्यात असून, या कराराबाबत सुमारे ९० टक्के सहमती झाली आहे, अशी माहिती ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'ने दिली आहे. यामुळे भारतातून ब्रिटनकडे होणारी निर्यात अधिक सुलभ होणार आहे. ब्रिटन सरकार भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्येच्या देशाशी लवकरच व्यापारी करार अंतिम करणार असल्याबाबत आशावादी आहे. या कराराच्या अनुषंगाने व्हिसा संबंधी वादग्रस्त मुद्दा बर्याच अंशी मार्गी लागला आहे, आणि आता उर्वरित चर्चा व्हिस्की, कार्स आणि फार्मास्युटिकल्सवरील टॅरिफ संदर्भात होत आहे. टॅरिफमध्ये घट होण्याची शक्यता लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या '१३व्या इकॉनॉमिक अॅण्ड फायनान्शियल डायलॉग'मध्ये दोन्ही देशांनी एफटीए आणि द्विपक्षीय गुंतवणूक करारावर (BIT) चर्चा करत परस्पर संबंध अधिक दृढ करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ब्रिटनच्या चॅन्सलर ऑफ एक्सचेकर रेचेल रीव्ह्स यांनी भूषवले. या करारामुळे भारतातील स्कॉच व्हिस्की, कार्स आणि औषधे यांच्या निर्यातीवरील टॅरिफ कमी होण्याची शक्यता असून, भारतासाठी युरोपियन बाजारपेठेत प्रवेश आणखी सोपा होणार आहे.