मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताचे बेल्जियमला आश्वासन; आर्थर रोड जेलमध्ये मिळणार १४ सुविधा

केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियम सरकारला
पत्राद्वारे आश्वासन दिले आहे की पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचा आरोपी मेहुल
चोक्सी भारतात आणल्यानंतर त्याला अमानुष वागणूक दिली जाणार नाही. त्याला
मुंबईच्या आर्थर रोड जेलच्या बॅरेक नंबर १२ मध्ये ठेवले जाईल आणि त्याला
मेडिकलसह १४ सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
चोक्सीविरुद्ध आरोप
- पंजाब नॅशनल बँकेत १३,००० कोटींचा घोटाळा.
- १२ एप्रिल रोजी
बेल्जियममध्ये अटक.
- २३ मे २०१८ व १५ जून
२०२१ रोजी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या दोन वॉरंटवर कारवाई.
- या प्रकरणात
चोक्सीचा भाचा नीरव मोदीही मुख्य आरोपी.
जेलमधील सुविधा (१४ पॉइंट्स)
- गर्दीपासून वेगळी १२
नंबरची कोठडी (२०x१५
ची स्वतंत्र रूम)
- अटॅच टॉयलेट व
बाथरूम
- ३ वेळचे जेवण व
स्वच्छ पाणी
- झोपण्यासाठी उशी, चादर व अंथरूण
- कोर्टाच्या
आदेशानुसार मेटल/लाकडी बेड
- सीलिंग फॅन, लाईट व वेंटिलेशन
- २४ तास CCTV निगराणी
- ताज्या हवेसाठी खुले
अंगण
- योग, मेडिटेशन, लायब्ररी
सुविधा
- मनोरंजनासाठी
बॅडमिंटन, बुद्धिबळ,
कॅरम
- २४ तास आरोग्य
सुविधा व ICU असलेले
२० बेडचे हॉस्पिटल
- ६ मेडिकल ऑफिसर, नर्स, फार्मासिस्ट
व लॅब
- आपत्कालीन
परिस्थितीत जे.जे. हॉस्पिटलची मदत
- कोर्टाच्या
आदेशानुसार घरचे जेवण परवानगी
गृह मंत्रालयाचे मत
भारताने स्पष्ट केले की, जेलमध्ये नियमित
साफसफाई, पेस्ट कंट्रोल व पाणीपुरवठ्याची उत्तम व्यवस्था
आहे. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चोक्सीसाठी विशेष आहारही देण्यात
येईल.