IND vs ENG 2nd Test – शुबमन गिलचे ऐतिहासिक द्विशतक

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू
असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने
ऐतिहासिक द्विशतक झळकावले. गिलने २६९ धावा करत कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक
साजरे केले आणि सचिन तेंडुलकर तसेच विराट कोहली यांचे मोठे विक्रम मोडले. भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावातच ५८७ धावांचा
डोंगर उभारला. गिलची खेळी विशेष ठरली, कारण SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक धावा
करणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने २००४ मध्ये सिडनीत नाबाद
३४१ धावा केल्या होत्या. तसेच, राहुल द्रविडने २००३ मध्ये अॅडलेड
येथे २३३ धावा केल्या होत्या, तर सुनील गावस्करने १९७९ मध्ये
ओव्हलवर २२१ धावा फटकावल्या होत्या. शुबमन गिलने इंग्लंडच्या
गोलंदाजांचा सुरेख सामना करताना चौफेर फटकेबाजी केली. त्याने विराट कोहली आणि सचिन
तेंडुलकर यांचे सर्वोच्च SENA धावांचे विक्रम एका खेळीत मागे
टाकले. विशेष म्हणजे, गिल हा पहिला भारतीय फलंदाज ठरला
आहे, ज्याने SENA देशांमध्ये २५० पेक्षा जास्त
धावांची खेळी साकारली आहे. या ऐतिहासिक खेळीमुळे भारताला मोठी
धावसंख्या उभारता आली असून, मालिकेत आघाडी घेण्याची संधी
निर्माण झाली आहे.