राज्यातील आदिबनजिग समाजाचा 3बी गटात समावेश – समाजाचे नेत्यांकडून स्वागत

विजयपूर कर्नाटक राज्यामध्ये राहणाऱ्या आदिबनजिग समाजाचा 3बी मागासवर्ग गटात समावेश करण्यात आला असून, राज्य मागासवर्ग आयोगाने संबंधित अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. लवकरच तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे समाजातील नेत्यांनी स्वागत केले आहे. सुरेश गच्चिनकट्टी, सोमनिंग कटावी आणि आदिबनजिग संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी सांगितले की, विजयपूर जिल्ह्यातील संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दशकांपासून आदिबनजिग समाजाच्या 3बी गटात समावेशासाठी मागणी सुरू होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांच्याशी थेट बैठकांमुळे व निवेदनांमुळे ही मागणी आता प्रत्यक्षात आली आहे. संघर्षाला मिळाले यश या निर्णयामुळे विजयपूर जिल्ह्यातील आदिबनजिग समाजात आनंदाचे वातावरण असून, विविध वेळा दिलेल्या निवेदनांचा आणि बेळगाव अधिवेशनातील प्रयत्नांचा हा यशस्वी परिणाम असल्याचे नेत्यांनी नमूद केले आहे. शालेय दाखल्यात “आदिबनजिग” नमूद करण्याचे आवाहन सरकारचा अधिकृत गॅझेट जाहीर होताच, मुलांच्या शालेय दाखल्यांमध्ये “आदिबनजिग” जात नमूद करण्याचे आवाहन नेत्यांनी समाजबांधवांना केले आहे. यावेळी अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.