सांगलीत पालकमंत्री कोणाला नको यावरच होतोय खल
.jpeg)
महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला याच आमदारांचे जिल्ह्याने बळ
देऊनही मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या सांगली जिल्ह्याचे पालकत्व कोणत्या
पक्षाकडे जाते याची असुकता जिल्झाला लागली आहे. मातब्बर नेत्यांची मांदियाळी
लावलेला हा जिल्हा आता अन्य जिल्ह्यातील नेत्यांच्या हवाली होणार असला तरी
पालकमंत्री कुणाला करायचे यापेक्षा कुणाला नको यासाठीच महायुतीतील नेतेमंडळी
प्रयत्नशील असल्याचे समजते.
जिल्ह्यातील आठ जागांपैकी वाचापलूस-कडेगाव आणि
तासगाव-कवठेमहांकाळ तीन मतदातामहायुतीने पाच जागा जिंकल्या, पापेकी खानापूर पळता अन्य बार ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले. लोकसभा
निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव महायुतीने विधानसभा निवडनुकीत मुऊन काढता विवमी
झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मताधिक्य कमी ठेवण्यात महायुती यशस्वी
ठरली. भरकम पाठबळ मिळाले असून मुष्दा मंत्रिमंडल सांगली जिल्हाला स्थान मिळाले
नाही. यामुळे महायुतीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांअस्वस्थता आहे. त्यात विधानसभा
निवडणुका होऊन महिना झाला तरी अद्याप जिल्ह्याचे पालकत्वाकडे याची उत्सुकता कायम
आहे. सांगलीला शेजारच्या जिल्ह्यातून पालकमंत्री दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात
असून यामध्ये चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे यांची नावे
भाजपच्या गोटातून सोडून शंभूराजे देसाई, राष्ट्रवादी
काँग्रेग (अजित पवार गटातून हसन मुश्रीफ यांचे नावही चर्चेत आहे. यापूर्वी मंत्री
पाटील यांनी एकवेळ सांगलीचे पालकत्व केले आहे. मात्र, यावेळी
त्यांचे लक्ष प्रामुख्याने पुण्यावर असल्याने त्यांची पहिली पसंती पुण्याला आहे.
तरीही किल्ल्यात त्यांचा असलेला संपर्क पाहता काही स्थानिक नेते त्यांच्याकडे
पालकत्व जावे यासाठी प्रयत्नशील आहेत तर कामान आमदारांनी त्यांच्याकडे पालकत्व
देण्यास विरोध दर्शवला आहे.
कर सांगलीचे पालकत्व शिवसेना (शिंदे) पक्षाकडे देण्याची
वेळ आलीच तर प्रामुख्याने शंभूराज देसाई यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे.
त्यांचा खानापूर गाव निकटचा संबंध असून त्यांची सासुरवाडी तासगाव तालुक्यात आहे.
तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वाट्याला सांगली जिल्हा आला तर कोल्हापूरचे
हसन मुश्रीफ यांच्याकडे विल्ह्याचे पालकत्व जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर
मंत्री जयकुमार गोरे यांचा सांगलीशी निकटचा संपर्क असून त्यांचा अलीकडे राबताही
वाढला आहे. यामुळे त्यांनाही पालकत्व मिळू शकते असा दावा केला जात आहे. यातूनच
त्यांच्या उपस्थितीत एका शासकीय कार्यक्रमाचे आयोजन सांगलीत करण्यात आले होते.
मात्र, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे हा कार्यक्रमच स्थगित
करण्यात आला होता. याकडेही गोरे समर्थक लक्ष वेपत आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री
नियोजन मंजाचा पदसिस्ट अध्यक्ष अगत्याने निधी वाटपात महत्वाचे ठरतात याशिवाय विविध
समिती नियुक्रीमध्ये पालकमंत्री महल्याचे असल्याने राजकीय लाभाची पदे देण्यात
पालकमंत्री महत्वपूर्ण ठरतात यामुळे जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडे जाते याकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे