दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: २०२६ पासून वर्षातून दोनदा CBSE बोर्ड परीक्षा

नवी दिल्ली :-
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने एक मोठा निर्णय घेत दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देण्याची संधी देण्यास मान्यता दिली आहे. हा नवा नियम २०२६ पासून लागू होणार आहे. 
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या शिफारशींचा भाग म्हणून, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले गुण मिळवण्याची दुसरी संधी उपलब्ध होणार आहे. सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी माहिती देताना सांगितले की"पहिली परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरी मे महिन्यात घेतली जाईल. दोन्ही परीक्षांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील." तथापि, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पहिल्या परीक्षेला बसणे अनिवार्य असेल. दुसऱ्या फेरीस बसणे ऐच्छिक असून, विद्यार्थ्याला आवश्यक वाटल्यास तो त्या परीक्षेला बसू शकेल.


विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?

  • चुकून खराब निकाल लागला तर दुसऱ्या फेरीत पुन्हा संधी
  • मानसिक तणावात घट
  • चांगला स्कोर करण्यासाठी पर्याय
  • एकाच परीक्षेत यशस्वी होण्याचा दबाव कमी

शिक्षण धोरणात ऐतिहासिक बदल

NEP 2020 अंतर्गत शिक्षणात लवचिकता आणि विद्यार्थ्यांच्या समग्र विकासावर भर दिला जात आहे. बोर्ड परीक्षांचा दडपण कमी करणे हा त्याचाच भाग आहे.