IIT बाबाची भविष्यवाणी ‘फेल’; भारताच्या दणदणीत विजयानंतर म्हणाला ..सॉरी

नवीदिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील गट फेरीत भारतीय
संघाने पाकचा दणदणीत पराभव केला आहे. भारताने पाकचा 6 विकेट्स राखून पराभव केला.
भारत-पाक सामन्याची जेवढी चर्चा सोशल मीडियावर रंगली, तेवढीच चर्चा आयआयटी बाबा म्हणून लोकप्रिय झालेल्या अभय सिंहच्या
भविष्यवाणीचीही चर्चा झाली. महाकुंभ मेळ्यातील एका व्हीडिओमुळे आयआयटी बाबा चर्चेत
आला होता. भारत-पाक सामन्यावरील भविष्यवाणी करणारा त्याचा एक व्हीडिओही समोर आला
होता. यामध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव होणार असे म्हटले होते.
मात्र, सामन्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सामन्यात
भारताचा विजय झाल्यानंतर आता आयआयटी बाबाकडून माफी मागण्यात आली आहे. तोंडघशी
पडल्याने आयआयटी बाबाने सोशल मीडियावर या चुकीच्या भविष्यवाणीसाठी माफी मागितली
आहे. त्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये तो माफी
मागताना दिसत आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, मी
सार्वजनिकपणे माफी मागू इच्छितो. तुम्ही सर्वांनी आनंद साजरा करा. ही पार्टीचे वेळ
आहे… मला मनात माहीत होते की भारत जिंकेल.’ दरम्यान, याआधी
त्याचा भारताच्या पराभवाची भविष्यवाणी करणारा व्हीडिओ व्हायरल झाला होता. या
सामन्यात पाकिस्तान जिंकेल. विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी कितीही प्रयत्न केले
तरी भारत जिंकू शकणार नाही!, असा दावा केला होता. मात्र,
सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची खिल्ली
उडवली जात आहे.