मोफत शिक्षण योजनेत शुल्क घेतल्यास परत करा – चंद्रकांत पाटील

पुणे : राज्यातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत देण्याच्या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट आदेश जारी केले आहेत. महाविद्यालयांनी विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नये, तसेच गेल्या वर्षी शुल्क घेतले असल्यास ते परत करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीत निर्णय हा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीस अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिकायत निवारणासाठी हेल्पलाइन आणि नोडल अधिकारी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, शुल्कविषयक तक्रारींचे तात्काळ निवारण केले जात आहे. यासाठी विशेष नोडल अधिकारीही नेमण्यात येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले. शिष्यवृत्ती योजनेचा मोठा लाभ लाख 3 हजार 615 विद्यार्थिनींना 784.46 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उच्च शिक्षण विभागाकडे आलेल्या 1,32,188 अर्जांपैकी 61,526 विद्यार्थिनींना 55.83 कोटी रुपये वितरित झाले असून, उर्वरित अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात आहे. सर्व अभ्यासक्रमांत १००% शुल्क सवलत पदविका, एमबीए, एमसीए, एम.फार्म यासारख्या अभ्यासक्रमांतही १०० टक्के शुल्क माफी लागू आहे. शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित संस्थांमधील आणि अभिमत विद्यापीठांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना ही सवलत लागू आहे. एकही विद्यार्थिनी वंचित राहणार नाही एकही विद्यार्थिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची खात्री महाविद्यालयांनी करावी,” असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयांना दिले आहेत.