"फुले चित्रपटाला विरोध थांबवा; अन्यथा रस्त्यावर उतरू" – लक्ष्मण हाके यांचा इशारा

पुणे: काही पाखंडी लोक महात्मा फुले यांच्या चरित्र चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण करत आहेत. महात्मा फुले यांच्या चित्रपटाला विरोध कायम राहिल्यास आह्मालाही रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी दिला आहे. अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा हे फुले या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रतिक महात्मा फुले यांच्या भूमिकेत आहे, तर पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमातून फुले दाम्पत्यांच्या संघर्षमय इतिहास पाहायला मिळणार आहे. या सिनेमावर लक्ष्मण हाके यांनी महात्मा ज्योतिबा फुले हयात असताना पाखंडी लोकांनी विरोध केला आज ही काही पाखंडी लोकं आहेत. इतिहास कोणी पुसणार नाही, विरोध जर केला तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा दिला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्याने त्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेते मंडळी पुण्यात दाखल झाले आहेत. समता परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महात्मा फुले वाड्याच्या जमिनीच्या अधिग्रहाणाबाबत पालिकेतील अधिकार टोलवाटोलवी करत असल्याचे सांगितले. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमाला अनेक नेते त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आले होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केले. तसेच भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकारने ऍक्शन मोडमध्ये आलं पाहिजे, असे देखील ते बोलताना म्हणाले. महापालिकेत लोकनियुक्त माणसे नाहीत. स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाहीत. महामानवांच्याबाबत त्यांना काय पडलं आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ओबीसीचे आरक्षण वाचवा आणि लवकर निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली. जनतेच्या प्रश्नावर, भिडे वाड्याच्या प्रश्नावर सरकारने ऍक्शन मोडमध्ये आलं पाहिजे, असे देखील हाके यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडे इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे करत असून अनेक ओबीसी नेत्यांनी देखील ही मागणी जोर लावून धरली आहे. यावर देखील हाके यांनी भाष्य केले. ओबीसी आरक्षणाबाबत इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी सांगितलं होतं त्याबद्दल सरकार उदासीन असल्याचे हाके म्हणाले आहेत.