हुतात्मा एक्सप्रेसला पुन्हा उशीर! प्रवाशांचे हाल, रेल्वे प्रशासनाची उदासीनता?
.jpeg)
सोलापूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये धावणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ला उशीर झाल्याने रविवारी सकाळी प्रवाशांची तारांबळ उडाली. रविवारच्या सुट्टीनिमित्त पुण्याकडे जाणाऱ्या असंख्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.हुतात्मा- इंटरसिटी एक्सप्रेस ही प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची आहे. मात्र अलीकडच्या काळात वारंवार गाडीला उशीर होण्याचे प्रकार घडत आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकावरून साडेसहा वाजता सुटणाऱ्या या गाडीला काही तांत्रिक कारणामुळे उशीर झाला. पावणेआठ वाजेपर्यंत गाडी न सुटल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात जत्रेचे स्वरूप आले होते. प्लॅटफॉर्म नंबर एक वर प्रचंड गर्दी असल्याने इतर गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कोंडी झाली. दरम्यान हुतात्मा एक्सप्रेस ला झालेल्या उशिराबद्दल चौकशी केली असता गाडीच्या काही डब्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या तंत्रज्ञानाचे टीम कार्यरत असून लवकरच गाडी निघणार असल्याचे ही त्या अधिकाऱ्यांनी सांगित
ले.