‘लेक लाडकी’ योजनेला भरघोस प्रतिसाद; लाभार्थ्यांची संख्या 1.58 लाख पार

मुंबई : मुलींचा जन्मदर वाढावा आणि त्यांचे आर्थिक सशक्तीकरण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने एप्रिल २०२४ पासून सुरू केलेल्या लेक लाडकी’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या आतापर्यंतच्या कार्यान्वयनात १ लाख ५ हजार ६५२ मुलींना लाभ मिळाला असून, यात नवीन वर्षात ४५ हजार ३२० नव्या मुलींचा समावेश झाला आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार मुलींना या योजनेचा लाभ मिळाला, तर मुंबई शहरात केवळ १०० मुली लाभार्थी ठरल्या. राज्य सरकारने यासाठी ७९ कोटी ३२ लाख ६० हजार रुपयांची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

योजनेची वैशिष्ट्ये आणि लाभ:
या योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना जन्मापासून १ वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण १ लाख १ हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे. या रकमेचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:

  • जन्मावेळी – ₹5,000
  • इयत्ता पहिली – ₹6,000
  • इयत्ता सहावी – ₹7,000
  • इयत्ता बारावी – ₹8,000
  • वय १८ पूर्ण झाल्यावर – ₹75,000

अर्ज कसा करायचा?

  • ग्रामीण भागातअंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिकांकडे
  • शहरी भागातअंगणवाडी सेविका व मुख्य सेविकांकडे
    त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी व मुख्य कार्यक्रम अधिकारी / नोडल
  • अधिकारी यांच्याकडे अर्ज पाठवला जाईल. अंतिम मंजुरीनंतर रक्कम खात्यात जमा केली जाईल.

सरकारचा उद्देश:
या योजनेमागे मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, शिक्षणास मदत करणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण हा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.