राज्यात पुन्हा हुडहुडी..! नगरला सर्वांत कमी तापमानाची नोंद
.jpeg)
पुणेः गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढल्याने राज्यात गारठा निर्माण झाला आहे. सकाळच्या सुमारास थंडी जाणवत असल्याने गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत आली आहे. तसेच राज्यामधील थंडी देखील वाढल्याने चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमान घटलेले आहे. सर्वांत किमान तापमानाची नोंद नगरला १०.५ अंश झाली असून पुण्यातील पारा १२ अशांवर आला होता. दुपारच्या वेळी मात्र उन्हाळी झळ जाणवत आहे. असे असले तरी पुढच्या दोन दिवसांमध्ये गारठा कमी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातीतल काही भागांत अंशत ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. परिमाणी थंडी कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील किमान तापमानात सातत्याने चढ उतार पाहिला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील गारठा काहीसा वाढलेला आहे. दोन दिवासांपासून पुण्यातही थंडी जाणवू लागली आहे. सकाळी आणि सायंकाळनंतर हवेत गारठा निर्माण होत आहे.