वैराग मध्ये दोन ठिकाणी घर फोडी ; २ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल चोरीला

वैराग , दि . १० सोने चांदीचे भाव सर्व सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जात असताना वैराग येथील दोन ठिकाणी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडुन घरातील सोने , चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असे २ लाख ३२ हजार रुपयाला मुद्देमाल अज्ञात चोट्याने चोरून नेल्या प्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही चोरीची घटना शनिवारी सायंकाळी सहा ते रविवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या पूर्वी जामदार प्लॉटिंग येथील सारिका अभिराज जामदार व शारदादेवी नगर मोहोळ रोड वैराग येथील रोफ गफूर बागवान यांचे घरी घडली. या धाडसी चोरी मुळे सर्व सामान्य जनतेत खळबळ उडाली आहे.

वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सारिका जामदार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ३० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या धातुच्या चादींचे तीन करंड , ४० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या धातूच्या दोन अंगठ्या , २४ हजार रुपये किंमतीच्या चांदीचा गणपती , ८० हजार रुपये रोख रक्कम असे एकुण २ लाख १४ हजाराचा मुद्देमात अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. 

रोफ बागवान यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १० हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या धातुचे पैंजने, गळ्यातील चैन, वाळे असे १८ हजार रुपयाच्या वस्तू चोरून नेल्या व ८ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले असे दोन्ही घरातील एकुण २ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरून नेल्या प्रकरणी वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आण्णासाहेब कुरुलकर वैराग प्रतिनिधी