हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर हल्ला; जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण, अपहरणाचा आरोप

धाराशिव :- सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आणि गजबजलेलं हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मात्र यावेळी कारण वेगळं
आहे. हॉटेलचे मालक नागेश
मडके यांच्यावर झालेल्या मारहाणीचा आणि अपहरणाचा आरोप समोर आला आहे. मडके यांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७ वाजता ते हॉटेलबाहेर उभे असताना, एका चारचाकी वाहनातून आलेल्या काही तरुणांनी सेल्फी
काढण्याचे कारण देत त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं. गाडीत नेल्यानंतर ४ ते ५ जणांनी त्यांना मारहाण केली. गाडी थेट धाराशिवकडे
नेण्यात आली. मडके यांनी आरोप केला
की, "या टोळीचा उद्देश मला जीवे मारण्याचा होता." त्यांनी सांगितले की वडगावजवळील पुलावर मारहाणीनंतर
त्यांना फेकून दिलं.
रुग्णालयात दाखल
गंभीर अवस्थेत असलेले
नागेश मडके यांनी नंतर कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यानंतर त्यांना तातडीने
रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते उपचार घेत असून, पोलिसांकडे तक्रार दाखल केली गेली आहे.
गुन्हा दाखल होण्याची
शक्यता
या प्रकरणात पोलिसांनी
चौकशी सुरू केली असून संबंधित आरोपींवर अपहरण, मारहाणी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
फॉर्च्युनर गाडीवरून
झाली होती चर्चा
काही दिवसांपूर्वी हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. कारण, हॉटेलच्या मालकांनी
नवीन फॉर्च्युनर SUV खरेदी केली होती आणि ती बातमी मोठ्या प्रमाणावर वायरल
झाली होती. त्यामुळे हॉटेल आणि मालक अचानक चर्चेत आले होते. या पार्श्वभूमीवरच ही
घटना घडल्याने अनेक संशय उपस्थित झाले आहेत.