सोलापूर शहरातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान
.jpeg)
सोलापूर / प्रतिनिधी
सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.० अंतर्गत पोषण ट्रॅकर मध्ये फेस रिकग्निशन सिस्टीमद्वारे १००% कामकाज पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मुख्यसेविका यांचा सन्मान पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नेहरूनगर येथील मागास समाज सेवा मंडळाच्या डी.एड. कॉलेज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सोलापूर नागरी विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर जिल्हा पूर्व अमृत सरडे, विशाल भोसले, समाज कल्याण हाऊस मास्टर राजन वाघमारे व अनिल कारंडे, मागास समाज सेवा मंडळाचे संचालक विवेक चव्हाण, मुख्यसेविका , रोहिणी निर्मळे, शितल ढेपे, रोहिणी कुलकर्णी, वंदना कुलकर्णी सविता जगताप,सुनिता बनसोडे,शैला धुमाळ,सुलन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व डॉ.विजय खोमणे व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम दीपक ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
विभागीय उपायुक्त संजय माने म्हणाले, पोषण ट्रॅकर आणि एफआरएस च्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बालकांचे आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये सुधारणा होण्यास मोठी मदत झाली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दाखवलेली निष्ठा आणि मेहनत प्रशंसनीय आहे. अशा प्रकारचे उपक्रम इतर प्रकल्पांसाठी ही प्रेरणादायी ठरतील. कुपोषणाचे दुष्टचक्र भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावे. बाल विवाह रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक ढेपे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोहिणी निर्मळे यांनी केले. सदर कार्यक्रमास शहरी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित हो
त्या.