रेपो रेट कपात; होम लोनच्या ईएमआयमध्ये दिलासा

मुंबई :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आपल्या चलनविषयक धोरण बैठकीत रेपो दरात 0.25% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रेपो दर ६ टक्क्यांवर आला असून, यामुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. ईएमआयमध्ये होणार दिलासा आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांकडून ग्राहकांना मिळणाऱ्या कर्जावरचा व्याजदर कमी होणार असून ईएमआयमध्ये थेट घट होणार आहे. विशेषतः होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

रेपो दर म्हणजे काय?

रेपो दर हा एक बेंचमार्क असतो, ज्यावर आधारित बँका ग्राहकांना कर्ज देतात. रेपो दर कमी झाल्यास बँकांना आरबीआयकडून कमी व्याजदराने पैसे मिळतात आणि त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात कर्ज मिळते. परिणामी, ईएमआय कमी होतो.

आरबीआयने रेपो दर का केला कमी?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या संरक्षणवादी टैरिफ धोरणे, एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किमती आणि जागतिक आर्थिक तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशांतर्गत आर्थिक प्रवाह टिकवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी सांगितले की, “महागाई नियंत्रित ठेवण्यासोबतच आर्थिक वाढीला गती देण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.पार्श्वभूमी गेल्या बैठकीत रेपो दर 0.25% ने कमी करून 6.25% करण्यात आला होता, आणि आता तो आणखी कमी करून 6% करण्यात आला आहे. ही सलग दुसरी कपात असून, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.