इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी

कोल्हापूर : फार काही दिवस नाही.... पण लवकरच घरात घुसून इंद्रजीत
सावंत यांचा खात्मा केला जाईल.... अशा शब्दात इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत धमकी
देण्यात अली आहे . यामुळे कोल्हापूरसह परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य
या नावाने आज शुक्रवारी दुपारी पुन्हा
जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इंद्रजीत सावंत यांना त्यांच्या घरात घुसून
त्यांचा खात्मा करण्यात येईल, असेही म्हटले आहे. केशव वैद्या यांच्या
कमेंट बॉक्स मध्ये धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. नागपूर येथील प्रशांत कोरटकर
याने चार दिवसापूर्वी इंद्रजीत सावंत यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या
प्रकरणावरून महाराष्ट्रात गदारोळ माजलेला असतानाच आणि संशयित कोरटकर यांच्या
शोधासाठी राज्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असताना शुक्रवारी दुपारी पुन्हा
इंद्रजीत सावंत यांना केशव वैद्य या नावाने धमकाविण्यात आले आहे.