ऐतिहासिक धक्का! भोसले घराण्याच्या तलवारीचा न्यूयॉर्कमध्ये ऑनलाईन लिलाव

नागपूर, २९ एप्रिल नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज कंपनीतर्फे ऑनलाईन लिलावात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ही तलवार श्रीमंत राजे रघुजी भोसले यांची असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, ती नेमकी कधी आणि कशी परदेशात पोहोचली याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. सोथबायतर्फे लिलाव; किंमत ७.९५ लाखांपासून सुरू ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या, पण न्यूयॉर्क मुख्यालय असलेल्या सोथबाय या नामांकित ब्रोकरेज कंपनीमार्फत या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव होणार आहे. लिलावाची सुरुवातीची किंमत ७ हजार ग्रेट ब्रिटन पाऊंड (सुमारे ७.९५ लाख रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांना आधी नोंदणी करावी लागणार आहे.

भोसले घराण्याचा इतिहास आणि तलवार परदेशात?

या तलवारीसंदर्भात अनेक इतिहासकार आणि नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज उत्सुक आहेत. भोसले घराण्याचे राजे मुधोजी भोसले यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले, "ही आमची ऐतिहासिक वारसा असलेली तलवार पुन्हा भारतात यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."

५३ ते १६४ या कालावधीत नागपूरकर भोसले आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या संघर्षात इंग्रजांनी भोसले घराण्याचा खजिना लुटला होता. त्यात या तलवारीचाही समावेश असावा, असा तर्क वर्तवण्यात येतो.

तलवारीची वैशिष्ट्ये

संबंधित तलवार युरोपियन शैलीतील असून तिच्यावर देवनागरी लिपीत कोरीव काम आहे. या तलवारीला सोन्याने मढवलेली मूठ आणि हिरव्या रंगाची विणलेली लोकरीची पकड आहे. एकेरी ब्लेड असलेली ही तलवार एकूण १२४ सेमी लांब आहे. तिची रचना आणि सौंदर्य आजही शौर्याची आठवण करून देते.