‘हिंदू शेरनी’ नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
.jpeg)
अमरावती : अमरावतीच्या भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. फोनवरून आलेल्या या धमकीत त्यांना "हिंदू
शेरनी हनुमान चालीसा पढ़ने वाली थोडे दिन की मेहमान है... जल्दी उडाने वाले है," असे म्हणत धमकावण्यात आले. या प्रकारामुळे नवनीत राणा यांनी तातडीने पोलिस
ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, धमक्यांचा स्त्रोत पाकिस्तानमधील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विविध पाकिस्तानमधील नंबरवरून हे कॉल आल्याचे सांगितले जात आहे. नवनीत राणा यांना आलेल्या या धमक्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या असल्याने मुंबई
पोलिसांकडून केंद्रीय यंत्रणांची मदत घेण्यात येणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अमरावतीतील नांदगावपेठ
एमआयडीसीमधील एका टेलरलाही पाकिस्तानातून धमकीचा कॉल आला होता. त्या कॉलमध्ये दिल्लीतील तीन ते चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता नवनीत राणा
यांना धमकी मिळाल्याने सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.