चोरट्याचा 'फ्लाइट प्लॅन' उघड? पोलिसांच्या कारवाईने धक्का!

विमानाने मुंबईत येऊन बड्या
घरांमध्ये घरफोड्या करणाऱ्या एका हायप्रोफाईल चोरट्याला मुलुंड पोलिसांनी शिताफीने
अटक केली आहे. राजेश अरविंद राजभर (वय ३२) असं या सराईत गुन्हेगाराचं नाव असून, तो मुंबईत पंधरा दिवस राहून पाच मोठ्या
घरफोड्या करून उत्तर प्रदेशात परत जाण्याच्या तयारीत होता.
🔎 पोलिसांची
कारवाई:
▪ मुलुंड पोलिसांनी
तांत्रिक तपासाच्या आधारे कळवा परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
▪ त्याच्याकडून २८
तोळे सोनं, २ किलो चांदी आणि रोख रक्कम असा एकूण १६ लाखांचा
ऐवज जप्त करण्यात आला आहे.
▪ मुलुंडच्या मॅरेथॉन
इमिनेन्स इमारतीसह मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पाच घरफोड्या केल्याचे उघड झाले
आहे.
🛫 'हवाई' चोरट्याची कार्यशैली:
▪ राजेश राजभर हा
विमानाने मुंबईत यायचा, काही दिवस राहून बड्या लोकांची
टार्गेटेड घरफोडी करायचा.
▪ चोरी पूर्ण झाल्यावर
पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशात परत जात असे.
▪ त्याच्यावर याआधीही
विविध पोलीस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे नोंद आहेत.
🚔 पोलिसांचं कौतुक:
या प्रकरणात मुलुंड पोलिसांनी वेळीच
तपास करून मोठ्या घरफोड्यांना आळा घातला आहे. राजेश राजभरकडून आणखी माहिती
मिळण्याची शक्यता असून, त्याचा घरफोड्यांचा
मोठा रेकॉर्ड उघड होण्याची शक्यता आहे.