केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात; मोठी दुर्घटना टळली
.jpeg)
केदारनाथ : उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे एक मोठी दुर्घटना टळली.
येथील हेलिपॅडजवळ वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी येणारे एक हेलिकॉप्टर लँडिंग
दरम्यान कोसळले. हे हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत अखिल भारतीय
आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथून केदारनाथला येत होते. हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्या
वेळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅडजवळ शनिवारी
हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी तेथे तैनात असलेले कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचारी
तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या अपघातात
कोणतीही जीवितहानी झाली नाही. हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले वैद्यकीय पथक आणि
पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या प्रशासनाकडून हेलिकॉप्टर
हेलिपॅडवरून काढून परिसराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे
मोठ्या संख्येने भाविक केदारनाथ धाममध्ये पोहोचत आहेत, अशा
परिस्थितीत ही दुर्घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रशासनाने हेलिकॉप्टर ऑपरेशन्सचे सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. अपघाताचे
कारण शोधण्यासाठी एक तांत्रिक पथक तैनात करण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित
असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात
तांत्रिक बिघाड हे अपघाताचे कारण मानले जात आहे. हवाई वाहतूक नियंत्रण आणि संबंधित
संस्थांनाही याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, केदारनाथ
हेलिकॉप्टर अपघातामुळे पुन्हा एकदा हवाई सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
डोंगराळ आणि संवेदनशील भागात जिथे हेलिकॉप्टर सेवा अनेकदा जीव वाचवणारी भूमिका
बजावतात. स्थानिक प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली आहे.