धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी १२ नोव्हेंबरला, निकालावर सर्वांचे लक्ष
नवी दिल्ली | प्रतिनिधी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील वाद सर्वोच्च न्यायालयात आज
पुनः चर्चेत आला. सुनावणी पूर्ण न होवता पुढील तारीख १२ नोव्हेंबर ठरवण्यात आली
आहे. यामुळे पक्ष चिन्हाचा निर्णय पुढे ढकलला गेला आहे.
प्रकरणाची
पार्श्वभूमी —
सध्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
ताब्यात आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
यावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यात अंतरिम अर्जाद्वारे पक्ष आणि
चिन्ह वापरण्यावर तात्पुरते निर्बंध घालण्याची मागणी केली होती.
वकील असीम सरोदेंची प्रतिक्रिया —
उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुनावणी करत असलेले वकील असीम सरोदे
यांनी सुनावणीपूर्वी X (पूर्वीचे ट्विटर) वरून एकनाथ शिंदे
यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले: "एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे
सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न होईल. हे प्रकरण जस्टीस सूर्यकांत यांच्या
बेंचसमोर असून निकाल लांबणीवर पडेल."असाच आरोप सत्य ठरल्यामुळे आजची सुनावणी पूर्ण होऊ शकली
नाही.
आगामी
महत्त्वाचे मुद्दे —
- पुढील सुनावणी १२
नोव्हेंबरला होणार
- स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाल दिला जाणार
- धनुष्यबाण चिन्ह
उद्धव ठाकरे यांना मिळेल की एकनाथ शिंदे यांच्याकडे राहील, हे निकालावर अवलंबून