परिसेविका राजश्री माने यांना आरोग्यसेवा पुरस्कार

सोलापूर :  सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरच्या परिसेविका राजश्री उज्ज्वलकुमार माने यांना पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात सुसंगत फाउंडेशनच्या वतीने ‘आरोग्य सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या या विशेष समारंभात प्राचार्य धोंडीराम गडदे यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या वेळी व्यासपीठावर साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या इंदूमती जोंधळे, सुसंगत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर न्हाळदे, सचिव संगिता न्हाळदे आणि वैशाली करे उपस्थित होते. राजश्री माने या ज्येष्ठ पत्रकार उज्वलकुमार माने यांच्या पत्नी असून, आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.