हर्षवर्धन सपकाळ होणार प्रदेश काँग्रेसचे नवे अध्यक्ष; राहुल गांधींकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर प्रदेश काँग्रेस मध्ये नेतृत्व बदल अटळ होते. प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिलेला राजीनामा श्रेठींनी मंजूर केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रदेश काँग्रेसची सूत्रे दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी मंत्री ताठ विद्यमान आमदार अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम आणि यशोमती ठाकूर यांची नवे चर्चेत असताना हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी लवकरच सपकाळ यांच्या नावाची घोषणा करतील असेही सूत्रांनी सांगितले.  हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे 2014 ते 2019 या काळात बुलढाणा मतदारसंघाचे आमदार होते. तसेच ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात. याशिवाय सपकाळ हे गांधी परिवाराचे जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. राज्यस्तरावर त्यांचे नाव फारसे चर्चेत नसले तरी संघटनेमध्ये ते एकनिष्ठतेने काम करत असतात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच, नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी  काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे म्हटले होते. नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळून 4 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचं नेतृत्व राज्यातून कोणाला मिळणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली असून 4 चार नावे आता समोर आली आहे. यातील एक नाव मराठवाड्यातील, दुसरं नाव विदर्भातील आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. यात काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासींसाठी काम करणारे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचे नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव देखील पुढे आले आहे. या चार जणांमधूनच नवीन प्रदेशध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव अचानक समोर आल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचे उत्तर मिळाले आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्त्वात नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यानतंर आता काँग्रेसने नव्या चेहऱ्याला संधी दिली आहे. या पदाच्या शर्यतीत माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री अमित देशमुख आणि युथ काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आमदार विश्वजीत कदम यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, या तीन बड्या नावांना डावलून काँग्रेसने सरप्राईजींग व्यक्तीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. बुलढाण्यातील काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबादारी दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राज्यातील काँग्रेसची धुरा देऊन काँग्रेसने आदिवासी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. कोण आहेत हगर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत बुलढाणा मतदार संघाचं प्रतिनिधित्त्व केलेले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पात ते सक्रिय राहिले आहेत. गांधी घराण्याचे ते विश्वासू नेते आहेत. पक्षाचे उपाध्यक्ष असताना राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचेसुद्धा ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. उत्तराखंड आणि पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विधिमंडळ पातळीवरसुद्धा अभ्यासू आणि आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आदिवासीसाठी त्यांनी जिवनोत्थान कार्यक्रम राबवला. त्यानंतर ते आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले.

हर्षवर्धन सपकाळ यांचा जन्म 10 जानेवारी 1968 साली झाला. हर्षवर्धन सपकाळ प्रचंड अभ्यासू आणि उच्चशिक्षित आहेत. बुलढाणा माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष असताना राबवलेलं शिक्षण मॉडेलची सर्वत्र चर्चा झाली. 14-15 वर्षे राहुल गांधी यांच्या कोअर टीममध्ये काम केले. 2014 साली पहिल्यांदाच बुलढाण्यातून काँग्रेसचे आमदार झाले. 2019 मध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळालं, पण पराभव स्विकारावा लागला. हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी पट्ट्यात मोठे काम केले आहे. राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं. कमिशन न घेणारा आमदार अशी त्यांची क्लिन इमेज आहे. ग्रामीण भागात काम, हार्डकोअर कार्यकर्ता, पक्षाशी निष्ठावंत आहेत. भाजपच्या ऑफरही होत्या, पण काँग्रेसच्या विचारसरणीवर ठाम राहिले.