पॅपाराझींवर हार्दिक पंड्याचा संताप; गर्लफ्रेंड माहिका शर्माचे ‘अयोग्य अँगल’मधून क्लिक केले फोटो पाहून संताप व्यक्त

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला ९ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात होत आहे. या मालिकेत काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हार्दिक पंड्या पुनरागमन करत आहे. मात्र, सामन्यांपूर्वीच तो क्रिकेटमुळे नव्हे, तर एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे.

हार्दिकचा सोशल मीडियावरील संताप

हार्दिक पंड्याने इन्स्टाग्राम स्टोरीवरून पॅपाराझींवर नाराजी व्यक्त केली. हार्दिकची गर्लफ्रेंड अभिनेत्री-मॉडेल माहिका शर्मा वांद्रे येथील रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना काही फोटोग्राफर्सनी तिचे फोटो ‘अयोग्य अँगल’मधून क्लिक केले. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर हार्दिकने यावर तीव्र प्रतिक्रिया दिली.

पंड्याने लिहिले की—
लोकप्रियता, प्रसिद्धी आणि कॅमेऱ्यांचा पाठलाग हा त्याच्या जीवनाचा भाग आहे, पण यावेळी मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. कोणत्याही महिलेसाठी असे फोटो अपमानास्पद ठरू शकतात.

माणुसकी आणि मर्यादा ठेवाव्यात” — हार्दिक

हार्दिकने पुढे म्हटले की, कोणाचेही खासगी क्षण ‘सनसनाटी हेडलाइन’ बनवणे चुकीचे आहे. तो पॅपाराझींना आदर देतो, त्यांच्याशी सहकार्यही करतो; पण “प्रत्येक गोष्ट प्रत्येक कोनातून क्लिक करण्याची गरज नसते,” असे कठोर शब्दांत सांगत त्याने मीडियाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

हार्दिकचा शेवटचा सामना कधी?

हार्दिक पंड्याने भारतीय संघासाठी शेवटचा सामना आशिया कप २०२५ मध्ये खेळला होता. श्रीलंकेविरुद्ध सुपर-४ सामन्यात त्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याने NCA येथे रिहॅब पूर्ण केला. तो वनडे मालिकेत खेळला नसला तरी टी-२० मालिकेतून दमदार पुनरागमन करणार आहे.