पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
.jpeg)
नवी दिल्ली
: हर हर महादेव... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज बुधवार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी
आहे. आज देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. प्रयागराजमध्ये गेल्या ४५
दिवसांपासून सुरू असलेल्या महाकुंभाची सांगता देखील आज महाशिवरात्रीने होईल. दरवर्षी
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला साजरा होणारा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक
पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान
शिवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. पुराणांतील उल्लेखांनुसार, या दिवशी शिव आणि
शक्तीचे मिलन झाले, तसेच शिवशंकरांनी तांडवनृत्य केले, असे मानले जाते. आज महाशिवरात्री,
त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट केली आहे. त्यात लिहिले
आहे की, 'भगवान भोलेनाथांना समर्पित महाशिवरात्री या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना
हार्दिक शुभेच्छा. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य
घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प बळकट करो, हीच माझी आशा आहे.' अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर -एक्स हॅण्डल
वरून शुभेच्या दिल्या आहेत.