शाळा-कॉलेज परिसरात गुटखा विक्रेत्यांना 'मोका' लावणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर: राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, तंबाखू आणि अमली पदार्थ विकणाऱ्यांवर तसेच राज्यात गुटखा तस्करी आणि विक्री करणाऱ्याविरोधात आता 'मोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये 'मोका' लावण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाकडून टोल वसूल केला जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज बुधवारी (दि.१०) सभागृहात दिले. जर टोल वसूल केला गेला असेल, तर त्या चालकांना ती रक्कम त्वरित परत करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज सभागृहात इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल घेतल्याच्या रिसिट असल्याचे सांगत, टोल वसुलीबाबत कारवाई करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे यांनी त्वरित याबाबत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.