GT vs MI : गुजरातचा पराभव, चिमुकला चाहता रडताना व्हिडीओ व्हायरल

चंदीगड : आयपीएल 2025 च्या एलिमिनेटर सामन्यात शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला. या पराभवानंतर गुजरातच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली असून, एका चिमुकल्या चाहत्याचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने साखळी फेरीत 14 पैकी 9 सामने जिंकून तिसरे स्थान मिळवले होते. त्यांच्या मजबूत कामगिरीमुळे संघाला आयपीएल जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात सलग तिसरा पराभव झेलावा लागल्याने संघाचे स्वप्न भंगले.मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (81), जॉनी बेअरस्टो (47), सूर्यकुमार यादव (33), तिलक वर्मा (25) आणि हार्दिक पंड्या (22) यांच्या दमदार खेळीमुळे 228 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात गुजरातचा डाव लय गमावल्यामुळे संघाला विजयापासून 20 धावांनी दूर थांबावे लागले. पराभवानंतर गुजरातच्या एका लहान वयाच्या चाहत्याचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सामना गमावल्यामुळे भावनांवर ताबा न राहिल्याचे अनेक दृश्यं मैदानात आणि स्टँडमध्ये पाहायला मिळाली. अनेकांनी हा व्हिडीओ भावनिक असल्याचे सांगत गुजरात संघाच्या खेळाडूंना भावनिक पाठिंबा दिला आहे.