माझी लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांचा सरकारकडून शोध सुरू

मुंबई | एप्रिल २५, २०२५ :
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण’ योजनेतून अयोग्य लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली
आहे. विशेषतः अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांचा तपास
सुरू असून, लवकरच त्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.
याआधीही, चारचाकी वाहन असलेल्या आणि
एकापेक्षा अधिक सरकारी योजना लाभलेल्या महिलांचा शोध घेऊन त्यांचा लाभ बंद करण्यात
आला होता. आतापर्यंत राज्यातील १२ लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी
जलद निर्णय, निकषांची गोंधळलेली अंमलबजावणी विधानसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही योजना जाहीर केली होती. केवळ दोन महिन्यांत साडेअकरा
लाख महिलांनी अर्ज केले. परंतु, अर्जांची नीट पडताळणी न होता
अनेक अपात्र महिलाही लाभार्थी ठरल्या.शासकीय तिजोरीवर ताण, इतर
योजनांचे निधी वळते अधिक संख्येने अर्ज आल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला असून,
इतर योजनांच्या निधीतूनही या योजनेसाठी पैसे वळवावे लागले. यानंतर
सरकारने पडताळणी प्रक्रियेला गती दिली आहे. आधारे आयकर खात्याकडून उत्पन्न तपासले जात
आहे. जे महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. दरम्यान, स्थानिक
प्रशासनाला अद्याप यासंबंधी कोणतेही स्पष्ट आदेश प्राप्त झालेले नसल्याचे
सांगण्यात आले आहे.