देशविरोधी पोस्ट करणाऱ्यांवर सरकारचा धडाका; सोशल मीडियासाठी नवीन धोरण लवकरच

नवी दिल्ली : केंद्र सरकार सोशल मीडियावर देशविरोधी विचारसरणी
पसरवणाऱ्यांवर आता थेट कारवाई करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय गृह मंत्रालय लवकरच
यासाठी नवीन धोरण आणणार असून, देशविरोधी पोस्ट व
व्हिडीओ शेअर करणाऱ्या हँडल्सना ब्लॉक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार
असल्याचे समजते. गुप्तचर संस्थांच्या उच्च अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाच्या संसदीय
समितीला माहिती दिली की, सोशल मीडियासह अनेक वेबसाइटवर
भारतविरोधी कंटेंट सातत्याने अपलोड केला जातो. यावर आता विशेष लक्ष देऊन कठोर
कारवाईचा विचार सुरू आहे.
देशविरोधी घटकांवर विशेष पथक तयार
होणार संसदीय समितीला सांगण्यात आले की, सोशल मीडियावर
देशाविरोधात द्वेष पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येईल. अशा
लोकांना ओळखून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. खलिस्तानी फुटीरतावादी
गुरपतवंत सिंग पन्नू व त्याच्यासारखे इतर दहशतवादी सोशल मीडियावर सक्रिय असून,
सातत्याने भारतविरोधी प्रचार करतात. सोशल मीडिया कंपन्यांशी चर्चा
सुरू या संदर्भात अमेरिकन सरकार आणि सोशल मीडिया कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे.
केंद्र सरकारचे मत आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी देखील त्यांच्यावर जबाबदारी
घेऊन असे कंटेंट रोखायला हवे. यासाठी सीबीआय, एनआयए, राज्य पोलिस व अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अन्य एजन्सी एकत्र येऊन व्यापक
रणनीती आखत आहेत, जी लवकरच अंमलात आणली जाईल. केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृह मंत्रालय देशाच्या अंतर्गत
सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.