गोपीचंद पडळकर यांचा गंभीर आरोप; रोहित पवारांवर हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचा दावा

सोलापूर :-भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर
हल्ल्याचे षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. २०२१ मध्ये सोलापूरमध्ये
त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा फेरतपास करून रोहित पवार यांना आरोपी करावे, अशी मागणी त्यांनी केली. पडळकर यांनी मांडला दावा माध्यमांसमोर
महादेव देवकाते यांना उपस्थित करून पडळकर यांनी सांगितले की, "देवकाते यांनी माझ्याकडे येऊन मला इशारा दिला होता की, तुमच्या विरोधात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे षडयंत्र रचत आहेत."
त्यांनी आरोप केला की, "धनगर समाजाच्या
लोकांना पुढे करून माझ्या विरोधात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे."
तसेच सध्या सुरू असलेल्या वाघ्या प्रकरणातही असाच कट रचला जात
असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडे मागणी या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून
रोहित पवार यांना सहआरोपी करावे, अशी मागणी पडळकर यांनी केली
आहे.