तिरुपती मंदिरातील हुंडी मोजणी सेवेसाठी सुवर्णसंधी; 'श्रीवारी परकामणी सेवा'ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर, ७ एप्रिल :– श्रद्धा आणि
भक्तीचा अनमोल संगम असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात भक्तगण जे दान करतात, त्या हुंडीतील रकमेची पारदर्शक मोजणी करण्यासाठी ‘श्रीवारी परकामणी सेवा’ सुरू करण्यात आली आहे. भक्तांना
श्रीवाऱ्याच्या सेवेत सहभागी होता यावे, यासाठी ही
विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सेवेचा उद्देश
- दानाची
शिस्तबद्ध मोजणी,
नोंदणी आणि व्यवस्थापन
- भक्तांना
सेवेच्या माध्यमातून योगदानाची संधी
सेवेचे स्वरूप
- तीन
दिवस सेवा करण्याची संधी
- हुंडीतील
नोटा,
सोनं-चांदी, चेक, नव्या
वस्तू, विदेशी चलन इ. यांची मोजणी
- सेवकांना
भोजन,
निवास आणि मूलभूत सुविधा विनामूल्य
- मानधन, मोबदला
किंवा विशेष वागणूक दिली जात नाही
- सहभागासाठी
पूर्वनोंदणी अनिवार्य
नोंदणीसाठी माहिती:
🌐 वेबसाइट: tirupatibalaji.ap.gov.in
📞 हेल्पलाईन: 0877-2233333
📞 टोल फ्री: 18004254141 /
18004253333