नेपाळमध्ये Gen Z आंदोलन उफाळलं; सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरले तरुण, काठमांडूत लष्कर बोलावलं

नेपाळमध्ये सरकारच्या सोशल मीडिया बंदीच्या निर्णयानंतर सुरु झालेलं Gen Z आंदोलन आता तीव्र झालं आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरले असून आंदोलन हिंसक वळणावर गेलं आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

 काय घडलं?

  • आंदोलकांनी प्रतिबंधित झोनमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला
  • संसदेच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न
  • पोलिसांनी वॉटर कॅनन, अश्रुधुराचे नळकांडे आणि रबर बुलेटचा वापर केला
  • आंदोलकांकडून झाडांच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या फेकल्या गेल्या
  • परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच लष्कराला पाचारण
  • काठमांडूच्या अनेक भागात कर्फ्यू लागू

 आंदोलन का पेटलं?
४ सप्टेंबर रोजी नेपाळ सरकारनं २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. यात फेसबुक, ट्विटर (X), व्हॉट्सअॅप आणि यूट्यूब यांचा समावेश आहे.
कारण – या कंपन्यांनी नेपाळच्या कम्युनिकेशन अँड आयटी मंत्रालयात नोंदणी केली नव्हती.

मात्र आंदोलनादरम्यान तरुणांच्या हातात नेपोटिझम विरोधी आणि भ्रष्टाचाराविरोधी फलके दिसली. यावरून स्पष्ट होतं की हे आंदोलन फक्त सोशल मीडिया बंदीपुरतं मर्यादित नाही तर भ्रष्टाचार आणि परिवारवादाविरोधात नेपाळी तरुणांचा मोठा उद्रेक आहे.

 सुरक्षा स्थिती

  • बनेश्वर भागापुरतं मर्यादित असलेला कर्फ्यू आता काठमांडूच्या अनेक भागात वाढवला
  • राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवासस्थानांची सुरक्षा वाढवली
  • लष्कर आणि पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात तैनाती