गौतम अदानींनी घेतली फडणवीस यांची भेट

मुंबई, दि. १०-

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अदानी यांनी यावेळी अभिनंदन केले. दरम्यान, त्यांच्या भेटीचे कारण अद्याप

स्पष्ट झालेले नाही. अदानी यांनी आज 'सागर' बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये दीड तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

अदानी महायुती सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे त्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीस

यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीने भाजप आणि अदानी संबंधांचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर मंगळवारी

संसदेच्या दोन्ही सभागृहांतही अदानी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तसेच मंगळवारी काँग्रेस नेत्या, वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी या 'मोदी अदानी भाई- भाई' अशी लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या होत्या.