"भावी महापौरांच्या" निबंध स्पर्धेचा उपक्रम — राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची संकल्पना
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या संकल्पने तुन भावी महापौरांच्या निबंध स्पर्धा घेण्यात येत आहेत, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली महापालिका कशी असावी या संदर्भात भावी महापौरांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, विस्कळीत पाणीपुरवठा, महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सोयीसुविधा, यासारख्या विषयांवर ही स्पर्धा असणार आहे, सदर स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या वतीने विजेत्याना प्रथम 11000, द्वितीय 7000 आणि तृतीय 5000 रुपये असे बक्षीसदिले जाणार आहे, या स्पर्धेसाठी प्रांतिक सदस्य दिनेश शिंदे,शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरोद्दीन मुल्ला, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निशांत सावळे, आणि पंडागळेयांची समिती नेमण्यात आली असून स्पर्धेचे ठिकाण वेळ आणि तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, तरी या स्पर्धेमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे संयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी केले आहे