हळदी -कुंकूच्या कार्यक्रमातून चपळगाव येथे समाजप्रबोधन;

अक्कलकोट: रथसप्तमीच्या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव
ग्रामपंचायतीने चपळगाव व बावकरवाडी गावातील महिलांना एकत्रित आणत वाण लुटण्याचा
कार्यक्रम घेण्यात आला. व्याख्याते नागेश कोकरे यांनी उपस्थित महिलांना
समाज प्रबोधनाचे धडे दिले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी पाटील या
होत्या. याप्रसंगी सरपंच वर्षा भंडारकवठे,उपसरपंच सुवर्णा कोळी,माजी जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री चव्हाण,माजी
सरपंच शोभा उटगे,यशोदा बाणेगाव,सुभद्रा
अकतनाळ,ग्रामपंचायत सदस्या रेश्मा तांबोळी,धनश्री वाले,गंगाबाई वाले,वंदना
कांबळे,गौराबाई अचलेरे,वर्षा सोनार,चित्रकला कांबळे,रेणुका जाधव,शोभा
गजधाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन करण्यात
आले.सुरुवातीला प्रार्थना तर कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् घेण्यात आले.यावेळी
उपस्थित महिलांना ग्रामपंचायतीकडून वाणाच्या
स्वरूपात भेटवस्तू प्रदान करण्यात आली.या कार्यक्रमात सर्व महिलांमध्ये उखाणे घेण्याची स्पर्धा लागली होती.प्रत्येक
महिलांमध्ये माझा मुलगा चांगला शिकणार की तुझा मुलगा चांगला शिकणार? माझ्या घरासमोर झाडे भरपूर लावणार की तुझ्या घरासमोर झाडे भरपूर लावणार?
माझी शेती चांगली की तुझी शेती चांगली अशा चांगल्या गोष्टींसाठी
स्पर्धा करण्याचे आवाहन वक्ते कोकरे यांनी
उपस्थित महिलांना केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पांडुरंग चव्हाण, यमुनाबाई गजधाने,विष्णुवर्धन कांबळे,उमेश सोनार,रवी कोरे,मिनाज
पटेल,आकाश बिराजदार,अमोल गजधाने
यांच्यासह अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा
वर्कर व बचत गटाच्या महिला कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.